मुंबई : सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत असंख्य सिनेमांची निर्मिती होतेय; त्यामुळे येत्या काळात बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांची रेलचेल पाहायला मिळेल. या आगामी सिनेमांची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. त्याहीपेक्षा कोणती कलाकार जोडी पाहायला मिळेल, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी‘ या सिनेमात बॉलिवूडची सुपरहिट जोडी काजोल आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याचं समजतंय. या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
यात काजोल आणि शाहरुख फक्त एका गाण्यात एकत्र दिसतील की त्यांच्या खास भूमिका असतील, हे स्पष्ट करण्यात आलेलं नाहीय. या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तर रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’ या सिनेमात काजोल आणि शाहरुख एकत्र येत असल्यामुळे दोघांच्या रियुनियनची चर्चा आहे.