रितेश देशमुखचे ट्वीट
याबाबत ट्वीट करताना रितेशने लिहिले की, ‘जर हे खरं असेल तर यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. रक्षकच भक्षक झाला तर न्याय मागायला जनता कुठे जाणार? अशा लोकांना रस्त्यावर फासावर लटकवले पाहिजे. सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी.’

अभिनेत्याने न्यायाची मागणी केली
उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील एका १३ वर्षीय मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिचे अपहरण केले. त्यानंतर पोलीस ठाण्यातील पोलीस स्टेशन प्रभारी (एसएचओ) यांनी मुलीवर पुन्हा बलात्कार केला. या आरोपांनंतर स्टेशन प्रभारी टिळकधारी सरोज यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाबाबत बोलताना स्टेशन प्रमुखासह सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याशिवाय पोलीस ठाण्यातील इतर सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना यापूर्वीच कर्तव्यावरून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची डीआयजी स्तरावर चौकशी करण्यात येत असून २४ तासांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.