मुंबई : काही दिवस सोशल मीडियावर हिंदी भाषेबद्दल वाद, प्रतिवाद सुरू होता. कन्नड अभिनेता किच्चा सुदीपनं हिंदी राष्ट्रभाषा नाही, असं म्हटल्यावर हे वाद सुरू झाले होते. त्यावर अजय देवगण म्हणाला होता, हिंदी आपली राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. त्यावर अनेक सेलिब्रिटींनी या डिबेटमध्ये भाग घेतला. अभिनेता जावेद जाफरीनंही त्याचं मत मांडलं होतं.

जावेद जाफरी काय म्हणाला?
इंडिया टुडेला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये जावेद जाफरी म्हणाला, ‘मी याबद्दल थोडं वाचलं. घटनात्मकदृष्ट्या कोणतीही एक भाषा नाही. मी तेच पाहिलं. मी अधिकृत भारतीय भाषा पाहत होतो आणि संविधान कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देत नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा माझा समज होता. पण मी आत्ताच पाहिलं की संविधान कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देत नाही.’

१३ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराने चिडला रितेश देशमुख

अभिनेता पुढे म्हणाला, ‘एकूण २२ अधिकृत भाषा आहेत. त्यापैकी आसामी, बंगाली, हिंदी, मराठी, गुजराती, उर्दू आणि सिंधी या सर्व अधिकृत भाषा आहेत. पण मुद्दा हा विविधतेतील एकतेचा आहे. आणि हेच या देशाचं सौंदर्य आहे. अनेक धर्म आहेत परंतु कोणताही एक राष्ट्रीय धर्म नाही. कोणतीही एक राष्ट्रीय भाषा नाही. आपल्याकडे राष्ट्रीय पक्षी किंवा राष्ट्रीय फूल आहे. सगळ्यांचं एकत्र असणं हेच देशाचं भविष्य आहे आणि मला वाटत नाही दुसऱ्या देशात ते आहे.’

अजय देवगण किच्चा सुदीप

किच्चा सुदीपमुळे सुरू झाला वाद
एका जाहीर कार्यक्रमात किच्चा सुदीप म्हणाला होता की, ‘आता हिंदी ही आता राष्ट्रीय भाषा राहिलेली नाही. बॉलिवूडमध्ये तामिळ आणि तेलुगू भाषांमधील सिनेमांचा रिमेक केला जात आहे. परंतु त्यानंतरही बॉलिवूडचा स्ट्रगल अजूनही सुरूच आहे. आज आम्ही जे सिनेमे बनवतो तेच संपूर्ण जगामध्ये पाहिले जात आहेत.’

खतिजाचं झालं लग्न! जाणून घ्या कोण आहे एआर रहमानचा जावई

सुरुवातीला यावर वाद घालणाऱ्या अजय देवगणनंही नंतर हिंदी राष्ट्रभाषा नसल्याचं मान्य करून क्षमाही मागितली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here