कोल्हापूर: लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या १००व्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात आदरांजली वाहण्यात आली. आज सकाळी १० वाजता संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांनी १०० सेकंद एका जागी स्तब्ध उभे राहून त्यांना आदरांजली वाहिली. तसेच आज दिवसभर शाहू महाराजांच्या विचारांचा जागर होणार आहे.
टाऊन हॉल नर्सरी बाग येथील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी शाहू प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे सकाळी १० वाजता सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसह शाहूप्रेमी जनतेने १०० सेकंद स्तब्ध उभे राहून महाराजांना आदरांजली वाहिली. त्यानंतर शाहू महाराजांचा जयघोष करण्यात आला .यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती, युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयश्री जाधव, पी्एन. पाटील, प्रकाश आबिटकर, राजू आवळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे नेते सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सेन्सेक्स गडगडला; गुंतवणूकदारांना १००० व्होल्ट्चा शाॅक, पाच लाख कोटी पाण्यात अहमदनगरमध्येही अभिवादन…
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १००व्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त कोल्हापुरात १०० सेकंदांसाठी स्तब्ध ठेवून त्यांना मानवंदना देण्यात आली. तशीच मानवंदना अहमदनगरमध्येही देण्यात आली. सकाळी १० वाजता शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून शाहू महाराजांना अभिवादन करण्यात येणार आले.