मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा महाविजेता ठरलेला अभिनेता विशाल निकम घराघरांत पोहोचला. शोमधील त्याच्या खेळानं आणि सादरीकरणानं त्यानं अनेकांची मनं जिंकली. विशेषतः विशालची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळतेय. बिग बॉसच्या घरात विशाल आणखी एका कारणामुळं चर्चेत होता. ते म्हणजे सौंदर्या. तो सतत सौंदर्याचं नाव घेताना दिसून आला. पण ही सौंदर्या नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न प्रेक्षक आणि चाहत्यांना पडला होता.
चाहत्यांची इच्छा होणार पूर्ण; शाहरुख-काजोल पुन्हा येणार एकत्र
विशालची सौंदर्या नक्की आहे तरी कोण? याबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. एका अभिनेत्रीसोबत विशालचं नाव जोडण्यात आलं होतं. परंतु विशालंन ती सौंदर्या नसल्याचं सांगितलं होतं. योग्यवेळ आल्यानंतर मी सौंदर्याला सर्वांसमोर घेऊन येईल, असं तो म्हणाला होता. पण आता ते शक्य नाही कारण विशाल आणि सौंदर्याचा ब्रेकअप झाला आहे. होय, खुद्द विशानं दोघांचा ब्रेकपअ झाल्याचं सांगितलंय.


काय म्हणाला विशाल?
मी सौंदर्यासोबत ब्रेकअप केलं आहे. लोकांना खोटं वाटत असेल की, मी सौंदर्याआणि तिच्यासोबतच्या नात्याबद्दल खोटं बोललो. पण हे खरं होतं. माझ्या आयुष्यात सौंदर्या होती. पण आता नाहीए. आमचे मार्ग आता वेगळे झालेत. सध्या मी सिंगल आहे. माझ्या कामावर लक्ष देत आहे.

कोण आहे विशाल निकम?
विशाल हा मुळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी गावचा आहे.’दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेमुळे विशालला प्रचंड लोकप्रियता मिळाली. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या मिथुन या सिनेमाद्वारे विशाललनं अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केला. या चित्रपटात विशालने महत्त्वाची भूमिका साकारली. ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेतील विशालच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्याचप्रमाणे ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेमध्ये देखील विशालने भूमिका साकारली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here