मुंबई- काल रात्री ‘बिग बॉस २’ मध्ये दिसलेल्या राहुल महाजनने पत्नी नतालियासाठी ग्रँड बर्थडे पार्टी दिली होती. या पार्टीसाठी त्याने टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक मित्रांनाही आमंत्रित केले होते, ज्यात अंकिता लोखंडे, मोनालिसा आदींचा समावेश होता. आता पार्टीतले अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात केक कटिंग सेलिब्रेशनचा व्हिडिओही आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक दिसत आहेत ज्यात एक व्यक्ती चाहत्यांना हुबेहूब सुशांतसिंह राजपूतसारखा दिसत आहे.

१३ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराने चिडला रितेश देशमुख

वीरल भयानीच्या इन्स्टाग्रामवरील या बर्थडे सेलिब्रेशन व्हिडिओमध्ये राहुलची तिसरी पत्नी म्हणजेच नतालिया तिचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. तिने केक कापला आणि अंकिता लोखंडेसह तिच्या सर्व मित्रांना केकचा तुकडा खायला दिला. या व्हिडिओमध्ये चाहत्यांना सुशांतची झलक एका पुरुषात पाहायला मिळाली.


सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘मित्रांनो, राहुल महाजनच्या मागे उभा असलेला मुलगा हुबेहूब सुशांतसिंह राजपूतसारखा दिसतो.’ फक्त त्या एका युझरलाच असे वाटले असे नाही तर अनेकांनी त्याच्या बोलण्यावर संमती दर्शवली आणि आश्चर्य व्यक्त केलं.

राहुल महाजन

नतालिया रशियन असून राहुलचं हे तिसरे लग्न आहे आणि ती त्याच्यापेक्षा १८ वर्षांनी लहान आहे. दोघांनी २०१८ मध्ये लग्न केलं होतं. अलीकडेच राहुल ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये चौथ्या लग्नाबद्दलही बोलला होता. चौथ्या लग्नाबद्दल तो म्हणाला होता की, ‘मी नतालियाशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही.’ राहुलने पहिलं लग्न श्वेता सिंगशी केलं होतं, जी त्याची बालपणीची मैत्रीण होती आणि दोघेही अमेरिकेतील फ्लाइंग स्कूलमध्ये एकत्र होते.

खतिजाचं झालं लग्न! जाणून घ्या कोण आहे एआर रहमानचा जावई

राहुल महाजन

यानंतर त्याने डिंपी गांगुलीशी लग्न केलं. २०१० मध्ये, राहुल महाजनचं स्वयंवर ‘राहुल दुल्हनिया ले जायेंगे’ झालं, जिथे त्याने डिंपीची जीवनसाथी म्हणून निवडले. त्याचं श्वेतासोबतचं लग्न केवळ दोन वर्ष टिकले, तर डिम्पीसोबतचं नातं पाच वर्ष टिकलं. दोन्ही पत्नींनी राहुलवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here