‘सध्या राजकारणात खूप काही घडत असताना त्यावर नाटकाच्या माध्यमातून मजेशीर टिप्पणी करण्याची ही चांगली संधी वाटली. बदलत्या काळाप्रमाणे ‘जाऊ बाई’चं रूपही नवं आणि राजकीय व्यंगचित्रात्मक असेल. पहिल्या भागात असलेल्या स्त्री कलाकारांची टीम याही नाटकात असेल. त्यांच्यापैकी अनेकजणी आज संसारात रमल्या असल्या तरी ज्यांना आज नाटक करणं शक्य असेल त्यांना घेऊन ही ‘जाऊ बाई’ पुन्हा ‘जोरात’ सुटेल’, असा विश्वास नाटकाचे लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केला. या नाटकाच्या निमित्ताने पुरुषोत्तम बेर्डे आणि निर्मिती सावंत ही जोडी पुन्हा एकत्र रंगमभूमीवर येईल. निर्मितीची धुरा दिलीप जाधव यांनी सांभाळली आहे.
२००० साली ‘जाऊ बाई जोरात’च्या वेळी राजकारण ऐन भरात होतं. मागील काही काळात राजकारणाला आलेली मरगळ सध्या झटकून निघाली आहे. पुरुषोत्तम बेर्डे यांनी त्यावर कशा प्रकारे गमतीजमती केल्या जाऊ शकतात, हे मला ऐकवलं. त्यामुळे पुन्हा ‘जाऊ बाई’ करताना मला फार मजा येणार असली तरीही मनात थोडीशी धाकधूकही आहे.
– निर्मिती सावंत