बीजिंग : सध्याची तरुणाई आरामदायी नोकरीच्या शोधात असते. अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या कर्मचाऱ्यांसाठी आश्चर्यकारक ऑफर देत असतात. अशाच एका विदेशी कंपनीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यानुसार जे कर्मचारी तिसर्‍या मुलाला जन्म देतील, त्यांना एक वर्षाची रजा मिळणार आहे. इतकंच नाहीतर सुमारे ११.५० लाख रुपये (९०,००० चीनी युआन) बक्षीसही दिले जाणार आहे.

आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बीजिंगच्या डबेनॉन्ग टेक्नॉलॉजी ग्रुपने (Dabeinong Technology Group) ही योजना सुरू केली आहे. यानुसार तिसऱ्या अपत्यावर ९०,००० युआन रोख बोनस देण्यात येणार आहे. याशिवाय महिला कर्मचाऱ्यांना कंपनीकडून १ वर्ष आणि पुरुष कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांची रजा दिली जाणार आहे. जर कर्मचाऱ्याला दुसरे अपत्य असल्यास ६०,००० युआन रोख बोनस मिळेल. म्हणजेच सुमारे ७ लाख रुपये. त्याच वेळी, पहिल्या मुलावर ३०,००० युआन म्हणजे सुमारे ३.५० लाख रुपयांचा रोख बोनस दिला जाईल.

भारत आणि फ्रान्सची चीनविरुद्ध एकजूट, नरेंद्र मोदी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या बैठकीत मोठा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या ३ मुलांशी संबंधित धोरणाचं समर्थन करत कंपनीने अशी योजना सुरू केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी १९८० मध्ये ‘वन चाइल्ड पॉलिसी’ लागू करण्यात आली होती. पण हे धोरण ४०-४५ पर्यंत लागू झाल्यानंतर देशातील वृद्धांची संख्या वाढू लागली. यासंबंधीच्या इतर समस्याही समोर येऊ लागल्या. यानंतर सरकारने २०१६ मध्ये ‘वन चाइल्ड पॉलिसी’ रद्द केली होती.

खरंतर, सरकारकडून नवीन धोरण लागू केल्यानंतरही, चीनच्या तरुण लोकसंख्येचा जास्त मुलं जन्म देण्याकडे विशेष कल दिसून आला नाही. त्यामुळेच आता कॉर्पोरेट क्षेत्राने यामध्ये पुढाकार घेतला आहे. अनेक कंपन्यांनी २०२१ पासून ‘थ्री चाइल्ड पॉलिसी’ अंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे.

रशियाला मोठा धक्का, अत्याधुनिक T-90M रणगाडा यूक्रेनकडून उद्ध्वस्त, भारताची चिंता वाढणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here