सोनाली सोशल मीडियावरदेखील खूप सक्रिय आहे. आता तिने १६ वर्षांआधीचा आणि आताचा फोटो शेअर केला आहे. या दोन फोटोंमध्येच सारंकाही दडलं आहे. या फोटोमध्ये सोनाली हॉलिवूड अभिनेता पियर्स ब्रॉसननसोबत दिसत आहे, जो जेम्स बाँडच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. या भेटीवेळी तिने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला आहे. खुल्या केसांमध्ये आणि सिंपल लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
यानंतर तिने पती गोल्डी बहलसोबतचा एक फोटो शेअर केला. ती त्याच पंजाबी ड्रेसमध्ये दिसते. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मला तेव्हाचे आणि आताचे फोटो आवडतात, कारण त्यात आपण किती बदललो ते कळतं. तरीही काही गोष्टी बदलल्या नाहीत… जसे की मी मला अजूनही हा जुना ड्रेस होतो. मी १६ वर्षांपूर्वी हा ड्रेस घातला होता आणि आता २०२२ मध्ये मी पुन्हा त्याच ड्रेसमध्ये आहे. या बाबतीत फारसा बदल झालेला नाही याचा आनंद आहे.’ असं असलं तरी अभिनेत्रीने गंमतीने लिहिलं की, ‘प्रत्येकाने लक्षात ठेवा की मी २०२२ मध्ये माझ्या जेम्स बाँड आवृत्तीसह आहे.’

अभिषेक बच्चन, हुमा कुरेशी, तब्बू यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या फोटोवर कमेंट करून प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याचवेळी, चाहत्यांना आश्चर्य वाटते की सोनालीने इतकी वर्ष तो ड्रेस जपून कसा ठेवला? याचवरून एका युझरने लिहिले, ‘मला आश्चर्य वाटतं की तुम्ही गेली १६ वर्ष हा ड्रेस तुमच्या वॉर्डरोबमध्ये कसा ठेवला…’ त्याचबरोबर अनेक चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचंही कौतुक केलं आहे. सोनालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती डान्स रिअॅलिटी शोची परीक्षक आहे. तिच्यासोबत मौनी रॉय आणि रेमो डिसूझाहेही या शोचे परीक्षक आहेत.
उर्मिला आणि आदिनाथच्या नात्यात दुरावा? हे ठरतंय चर्चेचं कारण