पार्टी होती करिश्माची पण नजरा होत्या करिना- मलायाकावरच

स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेत असलेली न्यासा नुकतीच हॉलिवूड सिंगर दुआ लीपा याच्या कॉन्सर्टमध्ये दिसली. यावेळी ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत धमाल करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. न्यासाचा मित्र ओरहान आवत्रमणी याने त्याच्या सोशल मीडियावर न्यासासोबतचा धमाल व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दुआ लीपाच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये न्यासा मित्रमंडळींसोबत डान्स करतानाही दिसत आहे. या फोटो आणि व्हिडिओवर न्यासाच्या चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
ओरहान हा न्यासा, जान्हवी कपूर, सारा अली खान यांचाही मित्र आहे. जान्हवी कपूरसोबत ओरहानचं नाव यापूर्वी जोडलं आहे. तर साराही ओरहानसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. अर्थात यावर कुणीच शिक्कामोर्तब केलेलं नाही. जेव्हा ओरहानने न्यासाचे फोटो शेअर केल्याचं जान्हवी कपूरने पाहिलं तेव्हा तिने ओ माय गॉड अशी कमेंट केली आहे. तसंच ओरहानने शेअर केले असा प्रश्नार्थक इमोजीही पोस्ट केला आहे. तर रणबीर कपूरची बहीण रिध्दिमा कपूरनेही न्यासाच्या या धमालमस्तीच्या फोटोंना लाइक करत माय गॉड अशी कमेंट केली आहे.
आधी बिग बींनी कंगनाच्या ‘धाकड’चं केलं कौतुक मग डिलीट केली पोस्ट, हे तर कारण नसेल ना?

न्यासा ही सध्या स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेत असली तरी ती बॉलिवूडमध्ये कधी येणार याची चर्चा सुरूच असते. गेल्याच आठवड्यात न्यासाने तिचा १९ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबाबत अजय देवगण असं म्हणाला होता की तिची अभिनयात आवड आहे की नाही हे अजून तिने सांगितलेलं नाही. तिने कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं ही तिची निवड असेल. आता आई काजोल आणि वडील अजय यांच्याप्रमाणे ती बॉलिवूडमध्ये येणार का हे पाहण्यासाठी काही दिवस वाट बघावी लागेल.
