हेच सगळं चित्र बदलण्यासाठी जनहित मे जारी हा सिनेमा पडद्यावर येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून दोन तासात एक मिलियन्स व्हयूज या ट्रेलरला मिळाले आहेत. कडू गोळी गोड बनवून द्यावी तसा हा गंभीर विषय विनोदाच्या अंगाने मांडण्यात टीम यशस्वी झाली आहेच पण जाता जाता कंडोमची आवश्यकता सांगणारा संदेशही या सिनेमात आहे.
न्यासा देवगण लंडनमध्ये काय करतेय बघा, फोटो बघून प्रत्येक जण म्हणतोय ओ माय गॉड!

अभिनेत्री नुसरत भरुचा आणि अनुद सिंह यांची जोडी या सिनेमात दिसणार आहे. कंडोमची गरज सांगण्यासाठी पुरूष नव्हे तर महिलेची निवड हा या सिनेमाचा यूएसपी आहे. त्यामुळेच महिलांच्या नजरेतून कंडोमची गरज मांडण्यात आली आहे. नुसरत या सिनेमात मनू या कंडोम विक्री करणाऱ्या मुलीची भूमिका करत आहे. घरगुती जबाबदारीमुळे कंडोम विकण्याची तिच्यावर वेळ येते. पण कंडोम विक्री करण्याच्या नोकरीमुळे तिच्या व्यक्तिगत व वैवाहिक आयुष्यातही काही समस्या निर्माण होतात. ट्रेलरपासून सिनेमा विनोदी अंगानेच पुढे जात असल्याने प्रेक्षकांना हसत हसत एक वेगळा विषय पाहण्याचा अनुभव मिळणार आहे.
जनहित मे जारी हा सिनेमा जरी विनोदी असला तरी त्यामध्ये अशा काही जागा आहेत की त्या विचार करायला भाग पाडतात. या सिनेमात मनूच्या तोंडी एक वाक्य आहे, आप उंगली उठाओ, मै आवाज उठाऊंगी. मनूच्या कामामुळे तिला दोषी मानणाऱ्यांना तिने हे उत्तर दिलं आहे. तर देशात वर्षाला दीड कोटी गर्भपात होतात, ज्यामध्ये महिलांचा जीव धोक्यात येतो. कंडोम पुरूषांसाठी गरजेचं असेल पण स्त्रियांसाठी जास्त जरुरीचं आहे. अशा अनेक संवादांनी हा सिनेमा अंगावर येतो.
राहुलच्या बायकोच्या पार्टीला चाहत्यांना दिसला सुशांतसिंह राजपूत
नुसरत सांगते, या सिनेमाची कथा ऐकल्यानंतर काही क्षणातच मी होकार दिला. ज्या गोष्टीवर बोललंही जात नाही तो विषय समाजापर्यंत मांडण्याची संधी मला या सिनेमाने दिली आहे. शिवाय एक महिला कंडोम विक्री करताना दाखवली तर विनोद आणि संदेश यांची सांगड कशी घालता येईल या विषयाने मला या सिनेमाकडे आकर्षित केलं.

अनुद सिंह या सिनेमातून हिंदीमध्ये पदार्पण करणार आहे. मनू या नायिकेला पाठिंबा देणाऱ्या नवऱ्याच्या भूमिकेत अनुद दिसणार आहे. एका हटक्या विषयावरच्या या सिनेमाच्या ट्रेलरलाच इतका प्रतिसाद मिळाला आहे की १० जूनला हा सिनेमा पडदयावर आल्यावर काय धमाल येईल त्याची ही झलक आहे.