चंद्रपूर : मार्च महिन्याचा पहिल्या आठवड्यापासूनच विदर्भातील तापमाण वाढू लागलं आहे. एप्रिल महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. शंभर वर्षात पहिल्यांदाच एप्रिल महिना हॉट ठरला. आता हवामान खात्याने दिलेला इशारा विदर्भासाठी चिंताजनक आहे. ८ मेपासून विदर्भात उष्ण लहरी धडकणार आहेत. त्यामुळे मे महिन्याचा जूना रेकॉर्ड मोडण्याची शक्यता खगोल अभ्यासक प्रा. सूरेश चोपणे यांनी व्यक्त केली.
शुक्रवारचं तापमान
चंद्रपूर – ४५.२
ब्रम्हपूरी – ४४.०
अकोला – ४३.७
अमरावती – ४३.८
वर्धा – ४४.४