मुंबई: वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विट करणारा बॉलिवूड अभिनेता केआरके अर्थात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असतानाही नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गर्दी होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचसंदर्भात केआरकेनं ट्विट केलं आहे.

करोनामुळं देशभरात लॉकडाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यात आला आहे. असं असतानाही देशातील अनेक राज्यांत मशिदींमध्ये एकत्र येऊन नमाज अदा करण्यात येत आहे. अशा घटना वारंवार समोर येत आहे. त्यामुळं या मशिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी परवानगी देण्यात येतेच कशी… परवानगी देणाऱ्या इमामांना थेट तुरुंगात टाका असं केआरकेनं म्हटलं आहे.

‘लॉकडाऊनमध्ये ज्या इमामांनी नागरिकांना मशिदींमध्ये नमाज अदा करण्याची परवानगी दिली त्यांना तुरुंगात टाका. धर्माच्या नावावर कायदे मोडण्याचा कुणालाही अधिकार नाही’, असं केआरकेनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. केआरकेचं ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून केआरकेचे ट्विट्स चर्चेचा विषय ठरत आहेत. करोनाच्या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसला असून १०० दिवसांत त्यांचा एकही विदेश दौरा झाला नाही असं त्यानं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here