नवनीत राणा खासदार: राणा दाम्पत्याच्या जामिनावरून शिवसेनेला कानपिचक्या, उमा भारतींचे ट्वीट चर्चेत – uma bharti tweet on navneet rana bail criticize on shivsena
अमरावती : मुंबई येथील मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठणासाठी गेलेल्या राणा दाम्पत्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्यांना नुकतीच जामीन मंजूर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या उमा भारती यांचे शिवसेनेला कानपिचक्या देणारे ट्वीट सध्या चर्चेत आहे.
उमा भारती यांनी राणाच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयातून सुटका झाल्याने समाधान लाभले आहे. त्यांच्या कर्तुत्वावर मला गर्व आहे. मी श्री उद्धव ठाकरे त्यांच्या सरकारकडून अशी अपेक्षा केली नव्हती.’ नागपूर उमरेड रोडवर भीषण अपघात, तवेरा ट्रकवर आदळल्यानं ५ जण जागीच ठार ‘शिवसेनेचा जन्म हा बाळासाहेब ठाकरे यांच्या तपातून झाला आहे. सर्व शिवसैनिकांनी विचार करायला हवा की ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची संस्कार आणि परंपरा आहे का तर. हनुमान चालिसा पठण करण्याचा स्थानावरून खासदार नवनीत राणा चुकीच्या असू शकतात. पण हनुमान चालीसा पठण कधीही आणि कुठेही चुकीचं असू शकत नाही.’
दरम्यान, विविध अटी शर्ती घालून खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे आतापर्यंत त्यांच्या समर्थनार्थ समोर होते. अशातच आज भाजपच्या फायबर नेत्या उमा भारती यांनी ट्विट करून राणा दाम्पत्याला समर्थ दिले आहे. भविष्यात ही सर्व मंडळी मिळून काय करणार आहे याची चर्चा आता रंगू लागली आहे.