म. टा. प्रतिनिधी, मुंबई :

नेपाळमधील कांचनजंगा शिखरावर चढत असताना महाराष्ट्रातील एका ५२ वर्षीय गिर्यारोहकाचा मृत्यू (Climber Death) झाल्याची घटना घडली आहे. नारायणन अय्यर असे मृत गिर्यारोहकाचे नाव आहे. पायोनियर अॅडव्हेंचर या गिर्यारोहक चमूसोबत ते कांचनजंगा येथे गेले होते.

महाराष्ट्राचे रहिवासी असणारे अय्यर हे गुरुवारी भारत-नेपाळ सीमेवर असलेल्या जगातील तिसऱ्या सर्वोच्च पर्वतशिखरावर चढाई करत होते. यावेळी त्यांना त्रास होऊ लागला. ते ८,२०० मीटर उंचीवर असताना ही घटना घडली. शिखरावर चढत असताना अय्यर आजारी पडले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

नागपूर उमरेड रोडवर भीषण अपघात, तवेरा ट्रकवर आदळल्यानं ५ जण जागीच ठार

दरम्यान, डेथ झोन म्हणून घोषित केलेल्या भागातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. माऊंट कांचनजंगा शिखरावर या मोसमात झालेला हा पहिला मृत्यू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here