१ एप्रिलला व्यावसायिक कारणांसाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरचे दर २५० रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर, मे महिन्यात त्यामध्ये १०२.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. व्यावसायिक कारणासांठी वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या एका सिलेंडरचे दर २२५३ रुपयांवर पोहोचले आहेत. २२ मार्चला १९ किलोच्या सिलेंडरच्या दरात ९ रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. ५ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरचे दर ६५५ रुपयांवर पोहोचले आहेत.
पेट्रोल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीमधील वाढ आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीमुळं होत असल्याचं सांगण्यात येत आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाचा देखील आंतरराष्ट्रीय व्यापारावर आणि इंधन तेलाच्या दरांवर होत असल्यानं दरवाढ झाल्याचं सांगितलं जातंय.
सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा सामना सामान्य जनतेला करावा लागत आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १२० रुपये लीटर तर डिझेल १०४ रुपये लीटर इतका आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा फटका बसणार आहे. आता १४ किलोंच्या घरगुती एलपीजी गॅस साठी १ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. आज एलपीजी गॅस दरात ५० रुपयांची दरवाढ झाल्यानं एका सिलेंडरची किमंत ९९९.५० इतकी झाली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर विविध कर लावण्यात आल्यानं प्रत्येक शहरामध्ये गॅस सिलेंडरचे दर वेगळे असतात.