नागपूर : विदर्भवासीयांना अजूनही उन्हाच्या चटक्यांपासून फारसा दिलासा मिळालेला नाही. सलग दुसऱ्या दिवशी विदर्भ देशात ‘हॉट’ ठरला. येत्या रविवारपासून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, १२ मेनंतर नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असून त्या काळात विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शुक्रवारी चंद्रपुरात ४५.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल वर्धा येथे ४४.४, यवतमाळ येथे ४४.२ तर ब्रह्मपुरी येथे ४४ अंश तापमानाची नोंद झाली. नागपुरातही ४३.७ अंश तापमान होते. ८ ते १० मेदरम्यान अकोला, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या सौम्य लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, सध्याचे तापमान बघता या काळात शहरातील तापमान ४५ अंशांच्या आसपास तसेच चंद्रपूर, अकोला व ब्रह्मपुरी येथील तापमान ४६ अंशांपेक्षा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर मात्र वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे.

ST ने कोकणात जाणार असाल तर थांबा! ‘या’ मार्गावर २५ मेपर्यंत वाहतूक बंद
बंगालच्या उपसागरात निर्माण कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे १२ ते १८ मे या काळात विदर्भात पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांमधील तापमान हे सरासरी किंवा त्यापेक्षाही कमी असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राणा दाम्पत्याच्या जामिनावरून शिवसेनेला कानपिचक्या, उमा भारतींचे ट्वीट चर्चेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here