परभणी : जेवण करण्यासाठी वाढ म्हणने एका पतीला चांगलेच महागात पडले आहे. पत्नीने डोक्यात काचेची बॉटल घालून आणि मुलींनी शिवीगाळ करून डोक्यात बॉटल मारून जखमी केल्याची घटना परभणी शहरातील आनंदनगर भागात घडली आहे. राजेंद्र खंदारे असे जखमी पतीचे नाव आहे.
सदरील प्रकार घडल्यानंतर परभणी शहरातील आनंदनगर येथील रहिवासी राजेंद्र खंदारे यांनी नानलपेठ पोलीस ठाणे गाटून पत्नी व मुली विरोधात तक्रार दिली असून पत्नी व मुली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास पोलीस करत आहेत.