मुंबई: रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत असल्याने मुंबईची चिंता वाढली आहे. धारावीत आज करोनाचे १५ तर दादरमध्ये दोन नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णांची संख्या ४३ तर दादरमधील करोना रुग्णांची संख्या १३वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेसमोरचं टेन्शन वाढलं आहे.

धारावीत सापडलेल्या १५ नव्या करोना रुग्णांपैकी ९जण हे राजीव गांधी क्वॉरंटाइन केंद्रातील आहेत. तिथे या नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. हे नऊ जण धारावीतील रहिवासी आहेत. ते धारावीतील सोशल नगरमध्ये मृत्यू पावलेल्या मृत व्यक्तीच्या आणि मदिना नगरमधील करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. तसेच केईएममधील कर्मचाऱ्यांच्याही संपर्कात आले होते. तर सहा नव्या करोना रुग्णांपैकी चारजण हे सोशल नगरजवळच्या शास्त्रीनगर येथील आहेत. तर दोनजण जनता हौसिंग सोसायटीमधील आहेत. या १५ नव्या रुग्णांमध्ये एका २० आणि २४ वर्षाच्या तरुणीचा समावेश आहे. तर इतर पुरुष हे १८ ते ६६ वयोगटातील आहेत.

धारावीत आतापर्यंत बलिगा नगरमध्ये ५, वैभव अपार्टमेंट, कल्याणवाडी आणि मदिना नगरमध्ये प्रत्येकी दोन, मुकुंद नगरमध्ये ९, धनवाडा चाळ, पीएमजीपी कॉलनी, मुरुगन चाळ, राजीव गांधी नगरमध्ये प्रत्येकी एक, मुस्लिम नगरमध्ये ५, सोशल नगरमध्ये ६, जनता सोसायटीत ४ आणि शास्त्रीनगरमध्ये चार रुग्ण आढळले आहेत. शास्त्रीनगरमध्ये पहिल्यांदाच ४ रुग्ण आढळले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

वाचा:

दादरचाही आकडा वाढता
दादरमध्ये आजही दोन नवे करोना रुग्ण सापडले आहेत. कामगार स्टेडियमजवळी आंबेडकर नगरमध्ये एका ५२ वर्षीय महिलेला आणि कासारवाडी येथील पालिका कर्मचारी वसाहतीतील ४८ वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही विभाग सील करण्यात आले आहेत. दादरमध्ये दोन नवे करोना रुग्ण सापडल्याने येथील करोना रुग्णांची संख्या १३वर गेली आहे. दादरमध्ये आतापर्यंत दिनकर अपार्टमेंट, सौभाग्य अपार्टमेंट, कासरवाडी आणि आंबेडकर नगरमध्ये प्रत्येकी एक, तावडेवाडीमध्ये ५, सुश्रुषा हॉस्पिटल आणि केळकर रोडवर प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here