विकास मिरगणे, नवी मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिन्ही पक्षांनी सिडको महामंडळ आपल्याकडे घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मात्र, ऐनवेळी दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ या म्हणीप्रमाणे हे महामंडळ काँग्रेसकडेही जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

या महामंडळावर अध्यक्ष पदांसाठी राष्ट्रवादीचे माजी आ. सुरेश लाड, उरणचे स्थानिक नेते प्रशांत पाटील यांची नावे चर्चात आहेत. सिडको महामंडळ हे आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्याने ते आपल्याकडेच रहावे यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस प्रयत्नशील आहे. तर काँग्रेसनेही यासाठी आग्रह धरलेला आहे. सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाले तरी आजतागायत सिडको माहामंडळावर अध्यक्ष नेमले गेले नाहीत.

Weather Alert : पाहा कधीपासून विदर्भात बरसणार पावसाच्या सरी, हवामान खात्याचा अंदाज
सुरेश लाड यांना महामंडळ दिले जाईल अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्जत येथील संवाद यात्रेचेवेळी केली होती. मात्र, त्यांना कोणते महामंडळ दिले जाणार याबाबत घोषणा त्यांनी केली. त्यांना राज्यमंत्री पदांच्या दर्जा दिला जाईल. लाड यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नाराजीही व्यक्त केलेली आहे. त्यामुळे लाड यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना सिडको महामंडळ दिले जाईल असे बोलले जात होते. मात्र, अडीच वर्षाचा कालावधी लोटला तरी सिडको काही कोणाला मिळाले नाही.

उरणच्या प्रशांत पाटील यांनीही सिडको अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी केलेली आहे. पण अद्याप त्यावर राजदरबारी निर्णयच झालेला नाही. तिन्ही पक्षांसाठी सिडको महत्वाचे असून या भागात पुन्हा उभारी घेण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस प्रयत्न करीत आहे. नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका निवडणूक यावर्षी होत आहे. त्यादृष्टीने सर्वांचे राजकीय पक्ष मोर्चाबांधणी करत आहे. नवी मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी ताकद कमी असल्याने त्यांनी सुद्धा जोर लावला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हे महामंडळ सेनाकडे असले पाहिजे यासाठी जोर लावला आहे.

पोलिसांच्या भीतीने सगळे राजकीय भोंगे गायब; राऊतांची बोचरी टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here