मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांच्या कारमधून उतरुन बसमधून प्रवास केला. स्टॅलिन यांनी २९ क या सार्वजनिक बसमधून प्रवास केला. माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव होता, मी लहानपणी शाळेत बसद्वारे जात असे, असं ते म्हणाले.
तामिळनाडूच्या विधानसभेत बोलताना एमके स्टॅलिन यांनी राज्यासाठी ५ मोठ्या घोषणा केल्या आहेत. तामिळनाडूमधील सरकारी शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या नाश्त्याची योजना स्टॅलिन यांनी जाहीर केली. ही योजना निवडक महापालिका, शहरी आणि ग्रामीण भागात राबवली जाणार आहे. तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांमधील कुपोषण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न, शालेय विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीची घोषणा स्टॅलिन यांनी केली. शहरी भागातील सार्वजनिक आरोग्य सुविधा विकसित करण्याची घोषणा देखील स्टॅलिन यांनी केली आहे.यासाठी स्टॅलिन सरकारकडून मुख्यंमंत्री तुमच्या मतदारसंघात या द्वारे ही योजना राबवण्यात आली आहे. आदर्श शाळांच्या विकासासाठी जाहीर करण्यात आलेल्या घोषणेसाठी १५० कोटी रुपयांचा निधी स्टॅलिन यांनी जाहीर केला. तर, पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.
तामिळनाडूमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकी एमके स्टॅलिन यांच्या द्रमुक पक्षानं अण्णाद्रमुकचा पराभव केला होता. तामिळनाडूमध्ये एमके स्टॅलिन यांच्या पक्षानं ७ मे रोजी सरकार स्थापन केलं होतं. तामिळनाडूच्या २३४ विधानसभेच्या जागांपैकी द्रमुकनं १३३ जागा जिंकल्या होत्या. द्रमुकाला तामिळनाडूमध्ये तब्बल १० वर्षानी पुन्हा सत्ता मिळाली होती. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत देखील द्रमुकनं विजय मिळवला होता.