फक्त पोटरा सिनेमाच नाही तर तिचं शहर होणं आणि कारखानीसांची वारी हे सिनेमेही या चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
काय आहे सिनेमाची कथा
‘पोटरा’ सिनेमा सामाजिक विषयावर प्रकाश टाकतो. सिनेमात गीता ही एक किशोरवयीन मुलगी दाखवण्यात आली आहे, जी शिक्षणात आणि इतर उपक्रमात फार हुशार असते. मात्र जेव्हा तिला मासिक पाळी येते तेव्हापासून तिची आजी गीताचं लग्न करण्याच्या मागे लागते. गीताची व्यक्तिरेखा छकुली प्रल्हाद देवकरने साकारली आहे. तर आजीची भूमिका नंदा काटे तर वडिलांची भूमिका सुहास मुंडेनी पार पाडली.
‘पोटरा’ म्हणजे काय?
‘पोटरा’ म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडत आहे. कच्च्या ज्वारीला पोटरा म्हणतात. सिनेमातली गाणीही फार अर्थपूर्ण आहेत. मुलीच्या गर्भावस्तेपासून ते किशोरावस्थेपर्यंतचा प्रवास गाण्यांतून मांडण्यात आला आहे.