मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिचं गरोदरपण मस्त एंजाॅय करत आहे. मार्चमध्येच तिनं ही गुड न्यूज दिली. सोनम सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. अनेकदा बेबी बंपबरोबरचे फोटो ती शेअर करते. आता तिनं तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलाय. त्यात ती तिच्या आवडचा गोड पदार्थ शिकत आहे. तोही लंडनच्या हाॅटेलमधल्या एका शेफकडून. सोनम कपूर नेहमीच डाएटबद्दल जागरुक असते. आताही तिला हवा असलेला पदार्थ स्वत:च तयार करते आणि खातेय.

सोनम कपूरनं नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. तो लंडनमधल्या हाॅटेलचा आहे. तिथे किचनमध्ये ती शेफबरोबर तिचं आवडतं डेझर्ट गोल्डन हेजलनट तयार करत आहे. तिनं व्हिडिओवर कॅप्शन लिहिली आहे. ‘माझ्या प्रेग्नंसीत मी @cedricgrolet गुड्स खातेय. माझ्या आवडत्या मित्रानं मला हे सरप्राइझ दिलं.’

कोंकणा सेनपासून अदिती रावपर्यंत हे कलाकार लावतात आईचं आडनाव


एकीकडे तिचे बेबी बंपसोबत फोटोसेशनही सुरू आहे आणि गरोदरपणातील काळजी घेणंही ती करत आहे. येत्या ऑगस्टमध्ये सोनमच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे. पण आई होणार या आनंदाबरोबरच या काळात होणारा शारीरिक त्रास, मानसिक अवस्थेतील बदल याचाही अनुभव ती घेतेय. पण पहिल्या तीन महिन्यातील त्रासाने सोनमला हैराण केलं आहे. एका मुलाखतीत सोनमने तिचा गरोदरपणातील अनुभव शेअर करताना अती झोप, बेचैनी सोसवेना झाल्याचं सांगितलं.

लग्नाबद्दल अथिया शेट्टीनं सोडलं मौन; राहुल, नवं घर याबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

सोनम कपूर फोटोशूट

काही मोजक्या सिनेमात काम केल्यानंतर सोनमने लंडनस्थित उदयोगपती आनंद आहुजा याच्यासोबत २०१८ ला लग्न केलं. लग्नानंतर सोनम तिच्या लंडनच्या घरी गेली. काही इव्हेंटसाठी तिचं भारतात येणं व्हायचं. ती प्रेग्नन्सीमुळे लंडनहून दिल्लीला आली. लवकरच ती मुंबईला येणार आहे. सध्या दिल्ली येथे पती तिची गरोदरपणात काळजी घेत आहे. नुकतेच तिने काळ्या रंगाच्या कफ्तान ड्रेसमध्ये केलेल फोटो शूट सोशल मीडियावर व्हायरल झालं. या फोटोंमध्ये तिच्या ड्रेसपेक्षा तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नन्सीचं तेज पाहूनच चाहत्यांनी तिच्यावर कमेंटचा वर्षाव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here