पतियाळा: एकीकडे संपूर्ण देश करोनाशी लढा देत असताना, दुसरीकडे पंजाबमधील पतियाळात निहंग शीखांनी (परंपरागत हत्यारे बाळगणारे निळ्या कपड्यातील शीख) एका पोलिसावर हल्ला करत त्याचा हात पूर्णपणे कापला. आज रविवारी सकाळी भाजी बाजाराच्या मुख्य गेटवर शीखांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात इतरही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

हरजीत सिंग असे शीखांच्या हल्ल्यात हात कापण्यात आलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या हल्ल्यात हरजीत सिंग यांचा हात कापला गेल्याचे पंजाबचे पोलिस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी सांगितले. हरजीत सिंग यांना चंदीगड पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याशिवाय बाजाराच्या बोर्डाचे अधिकारीही जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ७ लोकांना ताब्यात घेतले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here