पोलीस आणि कृषी विभागाचा बोगस कृषी कारखान्यावर छापा
डोंगरगाव सांगळुद रोडवरील शिसा बोंदरखेड शेतशिवारातील एका शेतात शेतकऱ्यांना बोगस कृषी साहित्य, खते आणि निविष्ठ बनविण्याचा गोरखधंदा सुरू होता. हे सारं अगदी विनापरवाना आणि बिनबोभाटपणे सुरू होतं. या ठिकाणी शेती उत्पन्न वाढविण्याचा दावा करणारी बनावट खतं, टॉनिक बनविलं जात होतं. दरम्यान, या ठिकाणी असा कारखाना चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यातूनच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटिल यांनी कृषी विभागाला सोबत घेत याठिकाणी गुरूवारी छापेमारी केली.
कारवाईच्या जबाबदारीची टोलवाटोलवी …
या प्रकरणात पुढची कारवाई काय?, यासंदर्भात आम्ही पोलीस अधिक्षकांचं विशेष पथक, कृषी विभाग आणि गुन्हा दाखल झालेल्या बोरगावमंजू पोलिसांशी संपर्क केला. मात्र, प्रत्येकाने यातील कारवाईसंदर्भात एकमेकांकडे टोलवाटोलवी केली. विशेष म्हणजे, एकानेही बोलतांना या प्रकरणाचा खरा ‘मास्टरमाईंड कोण?, यावर पुर्णपणे चुप्पी साधली आहे. या चुप्पीचा खरा ‘अर्थ’ पालकमंत्री बच्चू कडू आणि सरकाररला शोधावा लागणार.