महाराष्ट्राच्या नोंदणी महानिरीक्षक व मुंद्रांक नियंत्रक यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात जारी केलेलं परिपत्रक मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं रद्द ठरवलं आहे. यामुळं २० गुंठे पेक्षा कमी जमीनीची विक्री करण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो.

हायलाइट्स:
- नोंदणी महानिरीक्षक व मुंद्रांक नियंत्रक यांचं परिपत्रक रद्द
- मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
- १२ जुलै २०२१ चं परिपत्रक रद्द
महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध असल्याने खरेदीखत नोंदवण्यापूर्वी मंजूर केलेला पोट विभाग किंवा रेखांकन खरेदी दस्तासोबत जोडलेला नसल्यास नोंदणीसाठी स्वीकारण्यात येऊ नये असे आदेश होते. त्यामुळे याचिकाकर्ते गोविंद रामलिंग सोलापुरे, प्रकाश गडगूळ व कृष्णा रावसाहेब पवार यांनी नोंदणी महानिरीक्षकांच्या परिपत्रकाला आव्हान दिले होते.
याचिकाकर्ते प्लॉटिंगच्या व्यावसायात असल्याने त्यांनी ग्राहकांना विकलेल्या प्लॉट, रो हाउसबाबत खरेदीखत नोंदणी केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राशिवाय खरेदी खत नोंदणी करणार नाही, अशी प्रशानसाने भूमिका घेतल्याने याचिका दाखल करून, दोन्ही परिपत्रक कायद्याच्या विरोधात असल्याने ते रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती. सुनावणीनंतर न्यायालयाने १२ जुलै रोजीचे परिपत्रक व नियम ४४ (१) (I) रद्द ठरवले व नोंदणीसाठी आलेले दस्त परिपत्रकामुळे नाकारू नये, असे आदेश दिले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. रामेश्वर तोतला यांनी काम पाहिले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : bombay high court cancelled igr maharashtra circular about registration of lands
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network