Vasant More | मनसेच्या आंदोलनावेळी आपण पुण्यात का नव्हतो, याविषयीही वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आता वसंत मोरे सक्रिय झाले आहेत. त्यांनी पुण्यातील कात्रज परिसरात महाआरतीचे आयोजन केले आहे. या महाआरतीची तयारी पूर्ण झाली असून पोलिसांनीही या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. कात्रज परिसरात या महाआरतीसाठी स्टेज उभारण्यात आले आहे. याशिवाय, बॅनर्स लावून महाआरतीच्या कार्यक्रमाची जाहिरातही करण्यात आली आहे.

 

Vasant More Mahaarti
Vasant More |कात्रज परिसरात या महाआरतीसाठी स्टेज उभारण्यात आले आहे. याशिवाय, बॅनर्स लावून महाआरतीच्या कार्यक्रमाची जाहिरातही करण्यात आली आहे.

हायलाइट्स:

  • वसंत मोरे हा मनसेचा पुण्यातील प्रमुख आणि आक्रमक चेहरा आहे
  • मध्यंतरी झालेल्या प्रकारामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता
पुणे: मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनापासून दूर असलेले पुण्यातील नेते वसंत मोरे हे अखेर मैदानात उतरणार आहेत. राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा आदेशाशी विसंगत भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे (Vasant More) चर्चेत आले होते. त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पुण्यातील दौरा आणि अलीकडे झालेल्या आंदोलनापासूनही वसंत मोरे अंतर राखून होते. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेत अस्वस्थ असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. मात्र, आता राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी वसंत मोरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. (MNS Leader Vasant More To Perform Aarti With police Permission in Pune)

वसंत मोरे यांनी शनिवारी पुण्यात महाआरतीचे आयोजन केले आहे. मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून यासंदर्भात माहिती दिली आहे. आज कात्रजला संध्याकाळी सहा वाजता ऑफिस समोरील हनुमान मंदिरात मी महाआरती करतोय. यावं तर लागतयचं नक्की या मी वाट बघतोय, असा मजकूर या पोस्टमध्ये लिहला आहे. कात्रज परिसरात या महाआरतीसाठी स्टेज उभारण्यात आले आहे. याशिवाय, बॅनर्स लावून महाआरतीच्या कार्यक्रमाची जाहिरातही करण्यात आली आहे. त्यामुळे आता या महाआरतीच्या मुद्द्यावरून पुण्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या महाआरतीला परवानगीही दिली आहे.
मी ‘राजमार्गा’वरच होतो आणि ‘राजमार्गा’वरच राहीन: वसंत मोरे
वसंत मोरे हा मनसेचा पुण्यातील प्रमुख आणि आक्रमक चेहरा आहे. मध्यंतरी झालेल्या प्रकारामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता वसंत मोरे स्वत: महाआरती करणार असल्याने पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकले जाण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे मनसेचे पुण्यातील नेते हेमंत संभूस हे देखील मशिदींवरील भोंग्यांविरोधात आणखी आक्रमक झाले आहेत. पुणे शहरात बहुतांश मशिदींवरी भोंगे हे अनधिकृत आहेत. त्यामुळे पोलिसांनी हे भोंगे तातडीने उतरवावेत. अन्यथा आम्ही पोलीस चौकीसमोरच हनुमान चालीसा म्हणू, असा इशारा हेमंत संभूस यांनी दिला आहे.

भोंगे उतरत नाही तोपर्यंत मनसेचं आंदोलन सुरुच राहणार; राज ठाकरेंची परखड भूमिका

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mns leader vasant more maha aarti in pune before raj thackeray visit
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here