मुंबई- आपल्या बोलण्याने इतरांना खळखळवून हसवणाऱ्या विनोदवीर कपिल शर्मा चं स्वप्न साकार झालं आहे. खूप दिवसांपासून पाहिलेल्या या स्वप्नाची क्वचितच कोणाला कल्पना होती. पण आता कपिलनेच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून चाहत्यांना ही माहिती दिली. ज्या क्षणाची कपिल आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अखेर आला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, ‘द कपिल शर्मा शो‘ च्या सेटवरून, अर्चना पूरण सिंग, कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांच्यासह दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन देखील दिसत आहेत.

वयाच्या ४८ व्या वर्षी लग्न करतोय लिअँडर पेस, इथे वाचा डिटेल्स


आपल्या सहकलाकारांसोबतचे अनेक फोटो शेअर करत कपिलने कॅप्शनही लिहिले आहे. ‘जेव्हा तुमचे स्वप्न पूर्ण होते. सिनेसृष्टीचे दिग्गज कमल हासन यांच्यासोबत खूप छान वेळ घालवला. अप्रतिम अभिनेता आणि महान माणूसदेखील. आमच्या शोची शान वाढवल्याबद्दल कमल हासन सरांचे खूप खूप आभार.’ यासोबत कपिलने अनेक इमोजी आणि हॅशटॅगही पोस्ट केले आहेत.

एवढेच नाही तर कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कमल हासनसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये दोघेही कॅमेराकडे पाहत पोज देत आहेत. या पोस्टमध्ये, कॉमेडियनने अभिनेत्याला टॅग करत त्यांचं ‘ए जिंदगी गले लगा ले’ हे गाणं बॅकग्राउंडला लावलं. हे गाणं १९८३ मध्ये आलेल्या ‘सदमा’ सिनेमातील आहे, ज्यामध्ये कमल यांच्यासोबत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीदेखील होत्या. हा सिनेमा तेव्हा प्रचंड प्रसिद्ध झाला होता.

कोंकणा सेनपासून अदिती रावपर्यंत हे कलाकार लावतात आईचं आडनाव

कमल हासन- कपिल शर्मा

या सिनेमात दिसतील कमल हासन

कमल हासन यांचा एक सिनेमा येतोय, ज्याचं नाव आहे ‘विक्रम.’ हा एक तमिळ सिनेमा असून ३ जून रोजी रिलीज होणार आहे. राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून कमल यांनी सिनेमाची निर्मितीही केली आहे. स्वत: अभिनेत्याने त्यांच्या ट्विटर हँडलवर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल सांगितलं होतं. हा एक हाय अॅक्शन-ड्रामापट आहे. याचं दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केलं असून सिनेमात कमल हासनशिवाय विजय सेतुपती आणि फहाद फासिलदेखील दिसणार आहेत. जुलै २०२१ पासून सुरू झालेल्या या सिनेमाचं चित्रीकरण २ मार्च रोजी पूर्ण झालं. आता तो रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here