Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांनी २००० साली त्यांच्या आयुष्यात घडलेला कटू प्रसंग सांगितला. त्यांची दोन लहान मुले अपघातात गेली. त्यानंतर एकनाथ शिंदे पूर्णपणे कोलमडले होते. मात्र, आनंद दिघे साहेबांनी मला आयुष्यात पुन्हा उभं केलं, अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी सांगितली. दिघे साहेबांनी मला ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली. मी कामात बिझी राहिलो पाहिजे, एवढाच त्यांचा उद्देश होता.

हायलाइट्स:
- दिघे साहेबांनी मला ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली
- मी ठाण्याचा नगरसेवक असतानाही ते मला मुरबाड, कल्याण याठिकाणी कामं करण्यासाठी पाठवायचे
यावेळी एकनाथ शिंदे यांनी २००० साली त्यांच्या आयुष्यात घडलेल्या कटू प्रसंगाची आठवण सांगितली. माझी दोन लहान मुलं दिपेश ( वय ११) आणि शुभदा (वय ७) गावी बोटिंग करत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा जीव गेला. तो माझ्या आयुष्यातील काळा दिवस होता. त्यावेळी श्रीकांतही अवघ्या १४ वर्षांचा होता. २ जून २००० साली हा अपघात घडला. त्यानंतर मी पूर्णपणे खचून गेलो होता. मी तेव्हा फक्त कुटुंबाकडेच लक्ष द्यायचे ठरवले. त्यावेळी आनंद दिघे साहेब दर दिवसाआड माझ्या घरी यायचे. माझी विचारपूस करायचे. दिघे साहेब त्यावेळी माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहिले.
त्यांनी मला पुढे काय करायचे याबद्दल विचारले. तेव्हा कुटुंबाला माझी गरज असल्याचे मी त्यांना सांगितले. त्यावर दिघे साहेबांनी, ‘या समाजालाही तुझी गरज आहे. तुझं कुटुंब इतकं छोटं नाही, मोठं कुटुंब आहे. तुला लोकांसाठी काम करायचे आहे.’, असे मला सांगितले. त्यानंतर दिघे साहेबांनी मला ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली. मी कामात बिझी राहिलो पाहिजे, एवढाच त्यांचा उद्देश होता. मी ठाण्याचा नगरसेवक असतानाही ते मला मुरबाड, कल्याण याठिकाणी कामं करण्यासाठी पाठवायचे. त्याठिकाणच्या कार्यकर्त्यांना मला मदत करण्यासंदर्भात बजावून ठेवायचे. मी या भागांमध्ये गेल्यानंतर तेथील शिवसैनिक माझे फटाके वाजवून स्वागत करायचे. ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती. अनेकदा दिघे साहेबांनी मला दिलेली अवघड आणि सहजासहजी न होऊ शकणारी कामं अधिकाऱ्यांशी गोडीगुलाबीने बोलून करून घेतली. या सगळ्यातून दिघे साहेबांनी माझ्यातील नेतृत्त्वगुणांना संधी दिली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : my two kids died in accident after that anand dighe gave support to me says shiv sena leader eknath shinde
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network