नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये एखाद्या सामन्यातील विजय किंवा पराभव खुप काही गोष्टी बदलतो. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १२ एप्रिल या तारखेचे असेच काही महत्त्व आहे. १९७६ साली भारतीय संघाने बिशन सिंग बेदींच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव केला होता. तेव्हा वेस्ट इंडिजचे कर्णधारपद दिग्गज खेळाडू क्लाइव्ह लॉयड यांच्याकडे होते.

वाचा-
पोर्ट ऑफ स्पेनच्या त्रिनिदादमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना ७ एप्रिलपासून सुरु झाला होता. सामन्याच्या ५व्या आणि अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी २६९ धावांची गरज होती.

वाचा-
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती. त्यांनी पहिल्या डावात ३५९ धावा केल्या होत्या. यात व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी १७७ धावांची खेळी केली होती. भारताकडून भागवत चंद्रशेखर यांनी ६ तर कर्णधार बेदी यांनी ४ विकेट घेतल्या होत्या. भारताचा पहिला डाव २२८ धावांवर संपुष्ठात आला.

वेस्ट इंडिजने दुसरा डाव ६ बाद २७१ धावांवर घोषित केला आणि भारतासमोर विजयासाठी ४०३ धावांचे लक्ष्य दिले.

वाचा-
दुसऱ्या डावात भारताची पहिली विकेट ६९ धावांवर पडली. त्यानंतर सुनिल गावस्कर यांनी १०२ धावा करत संघाला १७७ पर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर गुंडप्पा विश्वनाथ यांनी ११२ धावांची शतकी खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या दिवसातील ३ सत्रात भारताला विजयाचे लक्ष्य गाठायचे होते. उपाहारानंतर मोहिंदर अमरनाथ आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी आक्रमक फलंदाजी केली. अमरनाथ ८५ धावांवर नाबाद राहिले तर बृजेश पटेल यांनी नाबाद ४९ धावा केल्या.

वाचा-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या डावात सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा हा विक्रम २७ वर्ष भारताच्या नावावर होता. भारताने चौथ्या डावात प्रथमच इतक्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. हा विजय भारतासाठी ऐतिहासिक होता.

वाचा-
वेस्ट इंडिजने एक वर्षापूर्वी १९७५ मध्ये पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर त्यांनी १९८९ साली दुसरा वर्ल्ड कपवर नाव कोरले होते. पण कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३चा वर्ल्ड कप जिंकत सर्वांना धक्का दिला होता. भारतीय संघाच्या वर्ल्ड विजयाचा पाया या कसोटी सामन्यातील विजयाने रचला होता.

२७ वर्षानंतर २००३ मध्ये वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारतीय संघाचा चौथ्या डावातील विजयाचा विक्रम मागे टाकला.

विशेष म्हणजे १२ एप्रिल ही तारीख क्रिकेटच्या इतिहासात आणखी एका कारणासाठी खास आहे. याच दिवशी वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने कसोटीत ४०० धावा करण्याचा पराक्रम केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here