मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार संजय राऊत, अभिनेता सलमान खान, रितेश देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये प्रविण तरडे दिग्दर्शित धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा लाँचिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यात अभिनेता सलमान खान यानं धर्मवीर आनंद दिघे आणि त्याच्यामध्ये असलेलं साम्य दाखवलं. तर,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिसरं साम्य सांगितलं. आनंद दिघे यांना जनतेनं धर्मवीर पदवी दिली, असंही ते म्हणाले.
‘अजित पवार आडवे आले तरी उचला’ कार्यकर्त्याच्या प्रश्नावर पवारांचा पोलिसांना सल्ला
सलमान खान काय म्हणाला?
नमस्कार, माझं नाव सलमान खान आहे, मला ट्रेलर फार आवडलं. आता मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलत होतो, त्यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्याबद्दल एक गोष्ट सांगितली. आनंद दिघे एका बेडरुमध्ये राहत होते, मी पण एकाच बेडरुममध्ये राहतो. आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, त्यांनी सांगितलं की आनंद दिघे यांचं लग्न झालं नव्हतं, माझं पण लग्न झालेलं नाही. धर्मवीर चित्रपट खूप चालेलं, असं सलमान खान म्हणाला.

तुम्ही दोघेही दबंग

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरु आणि शिष्य असं नात जपणारा एकमेव पक्ष शिवसेना आहे, असं म्हटलं. शिवसेना संपवण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना संपवून आम्ही पुढं गेलो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे एकमेकांसमोर आल्यानंतर राग निघून जायचा आणि प्रेम पाहायला मिळायचं. सलमानभाई तुम्ही दोन साम्य सांगितली मात्र, तुम्ही दोघेही दबंग आहात. एक पिक्चरमधील आणि एक जीवनातील दबंग होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी,मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
आनंद दिघेंसारखी लाख मोलाची माणसं बाळासाहेब ठाकरेंना मिळाली. त्यांच्या मुशीतून तयार झालेले शिवसैनिक मला मिळाले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आनंद दिघे आपल्यातून गेले त्यावेळी त्यांचं वय ५० होतं. दिवस रात्रीचा हिशोब केला तर त्यांनी १०० वर्ष आयु्ष्य जगलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या नावात ठाणेकरांचं ह्रदय असा उल्लेख हवा, असं मुख्यमंत्री म्हणाले. हा चित्रपट निष्ठा म्हणजे काय असतं ते दाखवणारा आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here