न्यूयॉर्क : युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच, तेथील शांततापूर्ण तोडग्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी केलेल्या प्रयत्नांना एकमताने पाठिंबा दिला आहे.

युक्रेनच्या युद्धाप्रश्नी सुरक्षा परिषदेची बैठक झाली. सध्या या परिषदेचे अध्यक्षपद अमेरिकेकडे असून, यामध्ये युक्रेनमधील शांतता आणि सुरक्षेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, या निवेदनामध्ये युद्ध किंवा संघर्ष असा शब्द वापरण्यात आलेला नाही. गुटेरस यांनी नुकतीच रशिया आणि युक्रेनला भेट देत दोन्ही देशांच्या अध्यक्षांबरोबर चर्चा केली. या दौऱ्यातील माहिती त्यांनी गुरुवारी सुरक्षा परिषदेला दिली. दरम्यान, युक्रेनमधील शांततेवर सुरक्षा परिषदेमध्ये झालेल्या एकमताच्या प्रस्तावाचे गुटेरस यांनी स्वागत केले आहे. पहिल्यांदाच युक्रेनमधील शांततेविषयी एकमताने
आनंद दिघे आणि माझ्यात दोन साम्य, सलमानच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिसरं सांगितलं, म्हणाले…
चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच बंदुका शांत होण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील मूल्ये जपण्यासाठी सर्व जगाने एकत्र येण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.

५० जणांची सुटका

कीव्ह मारिओपोल शहरातील पोलाद प्रकल्पामध्ये अडकलेल्या आणखी काही नागरिकांची शुक्रवारी सुटका करण्यात आली. या प्रकल्पातून ५० नागरिकांची सुटका करण्यात आल्याचे रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या नागरिकांना संयुक्त राष्ट्रे आणि रेड क्रॉसच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या नागरिकांमध्ये ११ मुलांचा समावेश आहे, असे रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकल्पातून सुटका करण्यात आलेल्या नागरिकांविषयी संयुक्त राष्ट्रांकडून मौन बाळगण्यात आले आहे. नव्याने सुटका करण्यात आलेल्या नागरिकांनाही झापोरिशिया शहरातच नेण्यात आले आहे.
राष्ट्रवादी-शिवसेना नवा संघर्ष?; आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविरोधात आव्हाड पत्नीचे ट्वीट
पोलाद प्रकल्पामध्ये अडकलेल्या सैनिकांच्या सुटकेसाठी काही प्रभावशाली देश प्रयत्नशील आहेत. असे सुतोवाच युक्रेनचे अध्यक्ष क्लाजिमिर झिल्येन्स्की यांनी केले. मात्र, त्यांनी या देशाचे नाव सांगितले नाही. या प्रकल्पामध्ये अडकलेल्या आमच्या सैनिकांना वाचवण्यासाठी आम्ही राजनैतिक पर्यायाचा उपयोग करत आहोत, असे त्यांनी एका व्हिडिओतील संदेशामध्ये नमूद केले आहे. दरम्यान, रशियाने या प्रकल्पाच्या परिसरामध्ये पुन्हा हल्ला सुरू केल्याचे आत अडकलेल्या सैनिकांकडून ‘टेलिग्राम’वरील संदेशात म्हटले आहे. मात्र, रशियाकडून त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here