Raigad Accident : रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात झाला आहे. एक बस 60 ते 70 फूट खाली कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून  मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार ठाणे येथून काही जण श्रीवर्धन येथील गावी एका कार्यक्रमासाठी निघाले असताना बसचा अपघात झाला. म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाण्याला राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी म्हसळा येथे येत असताना हा अपघात झाला. सध्या मदतकार्य सुरु आहे. अद्याप मृतांबद्दल आणि जखमींबद्दल अधिक माहिती कळलेली नाही.

(ही प्राथमिक माहिती आहे. आम्ही बातमी अपडेट करत आहोत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here