शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.तर, राज ठाकरे ५ जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

हायलाइट्स:
- आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्या दौऱ्यावर
- संजय राऊत यांची माहिती
- राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर
आदित्य ठाकरे २०१८ नंतर अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. आता १० जूनला आदित्य ठाकरे पक्षाच्या खासदारासंह अयोध्येचा दौरा करणार आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
अयोध्येत बॅनर कुणी लावले माहिती नाही
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी उत्तर प्रदेशात असली आणि नकली अशा प्रकारचे पोस्टर कुणी लावले याबाबत विचारण्यात आलं. यावर संजय राऊत यांनी ते बॅनर कुणी लावले हे माहिती नसल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे. कुणाचा दौरा कोणत्या कारणासाठी होतो, हे त्यांना समजतं, असं संजय राऊत म्हणाले. आमचा हा राजकीय दौरा नाही, असंही ते म्हणाले. शिवसेना खासदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठाकरे सरकार कुणाच्या दबावाखाली काम करत नाही, असं देखील ते म्हणाले. ठाकरे यांचाच दबाव असतो,असंही ते म्हणाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : shivsena leader aaditya thackeray will visit ayodhya on 10 june said by sanjay raut
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network