धुळे : जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा अधिक असताना नागरिकांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना दोन ते तीन दिवसाआड पाणी देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नाही.

धुळे शहरातील देवपूर भागातील दाट वस्ती असलेल्या लाला सरदार नगर मध्ये नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. एकीकडे धुळे महानगरपालिका नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी मोठमोठ्या योजनांच्या वल्गना करीत आहे. मात्र, दुसरीकडे नागरिकांना नऊ ते दहा दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिकांना स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने अक्षरशा अग्निशामक बंबाच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.

उदयनराजे शरद पवारांना भेटणार, काय आहे त्यांच्या मनात?; साताऱ्यात चर्चांना उधाण
एका अग्निशामक बंबने किती नागरिकांची तहान भागणार? असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला जात आहे. येणाऱ्या काळात जर दोन ते तीन दिवसात नागरिकांना पाणी मिळाले नाही तर धुळे महानगरपालिका आयुक्त यांच्या तोंडावर चपला आणि जोड्याने मारू, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

कोल्हापुरातील गावाचा विधवांबाबत क्रांतिकारी निर्णय, हेरवाडमध्ये विधवा प्रथा बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here