१३ एप्रिल हा दिवस नीतू आणि ऋषी यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी १९७९ साली या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यामुळेच रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाची पूजा १३ एप्रिलला ठेवली होती. याच दिवशी दोन वर्षापूर्वी नीतू यांच्यासोबत ऋषी यांचं शेवटचं बोलणं झालं. त्यानंतर ऋषी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि मग संवादच थांबला. पण तेव्हा ऋषी यांना खूप काही बोलायचं होतं पण राहून गेलं.
म्हणाल्या, मला ही कल्पनाच सहन होत नाही की ज्या दिवशी आम्ही साखरपुडा केला तोच दिवस काही वर्षांनी फिरून ऋषी यांना माझ्यापासून लांब नेणारा ठरला. याच दिवशी आमचं आयुष्यातील शेवटचं बोलणं व्हावा हा कसला दुर्दैवी योगायोग? पण परिस्थितीपुढे माणूस कसा हतबल होतो हे मला त्या दिवसानं दाखवून दिलं. ऋषी यांचे ते शेवटचे दिवस पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. त्यांना काहीतरी सांगायचं होतं पण सांगता येत नव्हतं. ते काय सांगायचं असेल याचा विचार केला तरी मला त्रास होतो.
नीतू सिंग या आजही ऋषी यांच्या आठवणीत मग्न असतात. पण त्यांनी कामात रमवूनही घेतले आहे. लवकरच त्यांचा जुग जुग जिओ हा सिनेमा झळकणार आहे. तर डान्स दिवाने ज्युनिअर या रिअॅलिटी शोमध्ये त्या परीक्षकाच्या खुर्चीवर आहेत.