मुंबई : पश्चिम मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. दहिसर ते बोरिवली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे . परिणामी दहिसर रेल्वे स्थानकावर एकामागोमाग लोकल गाड्यांची रांग लागली आहे. लोकल सेवेवर परिणाम झाल्याने सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत असणाऱ्या मुंबईकरांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Western Line Of Mumbai Local Trains Delays)

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास दहिसर ते बोरिवली स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. दहिसर, बोरिवली, विरार आणि नालासोपारा या स्थानकांवर जलद लोकलची वाट पाहणारे प्रवासी अडकून पडले आहेत.

फलाट तिकीट आता ५० रुपये, ‘यामुळे’ मध्य रेल्वेने घेतला निर्णय

दरम्यान, सकाळच्या सुमारासच लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्याने अनेकांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी उशीर होत असून या प्रवाशांकडून रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावरील लोकल वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता असून ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी वेगवान प्रयत्न सुरू आहेत, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here