पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचं एक मजली गोदाम आहे. या गोदामात बेकायदेशीर आणि विनापरवनागी विक्री करण्यात येत असलेल्या दारूचे बॉक्स ठेवण्यात आले आहेत. शहरातील सर्वच दुकाने बंद असल्याने काही चोरट्यांनी या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोदामालाच टार्गेट केलं आहे. चोरट्यांनी हे गोदाम फोडून गोदामातील सुमारे तीन लाख रुपयाहून अधिक किंमतीचे दारुचे बॉक्स लंपास केले. चोरट्यांनी एक दोन नव्हे तर सुमारे ६८ बॉक्स लंपास केले होते.
आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम हाती घेऊन दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या दोन्ही तळीरामांची कसून चौकशी करण्यात येत असून त्यांच्या साथीदारांची माहिती घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times