NIA raids in Mumbai | राष्ट्रीय तपास यंत्रणेने फेब्रुवारी महिन्यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयए सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई करताना दिसत आहे. आजची कारवाईही त्याचाच एक भाग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊद गँग मुंबईत पुन्हा सक्रिय झाली होती. त्यांच्याकडून देशातील काही प्रमुख व्यक्तींना इजा किंवा घातपात करण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती एनआयएला मिळाली होती.

 

NIA Dawood
NIA raids in Mumbai |दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शुटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले आहेत.

हायलाइट्स:

  • दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शुटर्सच्या मालमत्तांवर छापे
  • या कारवाईतून आता एनआयएच्या हाती काय लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत
मुंबई: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मुंबईतील जवळपास २० ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. एनआयएने सोमवारी सकाळी या कारवाईला सुरुवात केली. भेंडीबाजार नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, भिवंडी, सांताक्रुझ येथील एकूण २० ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याचे वृत्त आहे. दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शुटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईतून आता एनआयएच्या हाती काय लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने फेब्रुवारी महिन्यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयए सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई करताना दिसत आहे. आजची कारवाईही त्याचाच एक भाग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊद गँग मुंबईत पुन्हा सक्रिय झाली होती. त्यांच्याकडून देशातील काही प्रमुख व्यक्तींना इजा किंवा घातपात करण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. याच माहितीच्याआधारे एनआयएने आजची कारवाई केल्याचे सांगितले जाते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : nia raids begin at several locations in mumbai in connection with gangster dawood ibrahim
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here