मुंबई-धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच नव नवे विक्रम करत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लागलेले सिनेमाचे ३० फुटी कट आऊट्स सर्वांचं लक्ष तर वेधून घेत आहेतच शिवाय सिनेमाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण करत आहेत. सिनेमाच्या प्रसिद्धीच्या या तंत्रात आता भर पडली आहे एका लक्षवेधी अशा विक्रमाची. अशी गोष्ट जी आजवर मराठी सिनेमाच्या प्रसिद्धी किंवा जाहिरात तंत्रात कधीच घडली नव्हती.

धर्मवीर

मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे १६८०० स्क्वेअर फुटाचे भव्य असे होर्डिंग आहे. या होर्डिंगवर आजवर एकाही मराठी सिनेमाचं पोस्टर झळकलं नव्हतं. परंतू आता ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाचं भव्य दिव्य पोस्टर झळकले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांचा हा तेजस्वी आणि करारी बाण्याचा लुक मोठ्या दिमाखात या होर्डिंगवर पाहायला मिळत असून या भागातून जाणाऱ्या लाखो वाहनधारकांचे तथा परिसरातील रहिवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.

Video : हृतिक रोशन आणि सबा आझाद यांनी दिली खास नात्याची हिंट

आयुष्यात प्रत्येकजण राजकारण करतच असतो- मंगेश देसाई

सध्या सर्वत्र याच होर्डिंगची चर्चा पाहायला मिळत आहे. आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या लोककारणी आनंद दिघे यांचा चरित्रपट असलेल्या या सिनेमाचे हे होर्डिंग बघताना आभाळासम भासे धर्मवीर हा असाच भाव सर्वांच्या मनात उमटत आहे. झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा सिनेमा येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

तीर्थरुप आईस… ‘मदर्स डे’निमित्त स्टार किड्सचा आईला खास मेसेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here