मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्हाला २० फूट खोल गाडण्याची धमकी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याविरोधात मी दिल्लीत एफआयआर दाखल करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे याची तक्रार करणार आहे. महाराष्ट्रात पोलिसांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. पण तशी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता मी अमित शाह यांना भेटून केंद्रातूनच संजय राऊत यांच्यावर कारवाई करायला लावणार, असा इशारा नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दिला. नवनीत राणा आणि रवी राणा सोमवारी सकाळी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी नवनीत राणा यांनी मुंबई विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आम्ही शिवसैनिक जन्मत: माजोरडे, नादाला लागले तर २० फूट खाली गाडू : संजय राऊत
यावेळी नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले. अजित पवार हेच मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त काम करतात. अजितदादांना आम्ही मानतो, त्यांना सुद्धा आमच्याबद्दल माहिती आहे. खार पोलीस ठाण्यात पोलिसांनी आम्हाला चहा पाजल्याचा उल्लेख करण्यात आला. पण अजितदादांनी तुरुंगात आमच्यासोबत काय झाले, याचीही माहिती घ्यावी, असे नवनीत राणा यांनी म्हटले.तसेच आज आम्ही अमित शहा आणि लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटणार आहोत. आमच्यासोबत तुरुंगात काय झाले, याची माहिती त्यांना देणार आहोत. आम्ही या सगळ्याविरोधात केंद्रातून कारवाई करायला लावू,असे नवनीत राणा यांनी म्हटले.
राणा दाम्पत्य दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटणार, ठाकरे सरकारची तक्रार करणार

रवी राणांची पोलिसांवर आगपाखड

आम्हाला खार पोलीस ठाण्यात पोलिसांना चहा पाजला. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही तुम्हाला जामिनावर सोडू, असे सांगितले. मात्र, त्यानंतर कोणालाही पत्ता न लागू न देता आम्हाला सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री साडेबारा वाजता आम्हाला सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी तुम्हाला उद्या सकाळी न्यायालयात नेऊ, असे सांगण्यात आले. सकाळी पाच वाजेपर्यंत आम्हाला पाणी आणि सतरंजीही देण्यात आली नव्हती. त्यामुळे आम्ही पोलिसांनी व्यवस्थित वागणूक दिली नाही, असा आरोप केल्याचे रवी राणा यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here