नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण शहरातील शाहीन बाग परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी बुलडोजर येताच स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कारवाईला विरोध केला. या मोहिमेतून केवळ एका समाजाला लक्ष्य केलं जात आहे, असं म्हणत शाहीन बागमध्ये महिला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या. त्यामुळे महानगरपालिकेला ही मोहीम थांबवावी लागली आहे.

पोलीस संरक्षणासह आज सकाळी अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी बुलडोजर घेऊन शाहीन बागमध्ये (Shaheen Bagh Delhi) पोहोचले. मात्र या कारवाईला परिसरातील लोकांना जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली. शाहीन बागमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधीदेखील घटनास्थळी पोहोचले. ‘बुलडोजर दाखवून शाहीन बागमध्ये भीतीचं वातावरण तयार केलं जात आहे,’ असा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे.

‘संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याची अमित शहांकडे तक्रार करणार; केंद्रातून कारवाई करायलाच लावणार’

‘नोटीस न देताच कारवाई’

शाहीन बाग येथील रहिवाशांनी प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे. आम्हाला कसल्याही प्रकारची नोटीस न देता बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात येत आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. ही करवाई संविधानविरोधी असल्याचंही या नागरिकांचं म्हणणं आहे.

दुसरीकडे, शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या कारवाईविरोधात स्थानिक नगरसेवक वाजिद खान यांनीही जोरदार हल्लाबोल केला. अनधिकृत असल्याचं सांगत तुम्ही जर प्रत्येकाचं घर पाडणार असाल तर ८० टक्के दिल्ली शहरच अनधिकृत आहे, ते तुम्ही पाडणार का, असा सवाल खान यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here