भादोही, उत्तर प्रदेशः एका महिलेने आपल्या पाच मुलांना गंगा नदीत फेकल्याचा आरोप आहे. पतीशी झालेल्या भांडणातून रागात तिने मुलांना फेकल्याचं सांगण्यात येतंय. नदी फेकलेल्या मुलांनी पैकी एका ११ वर्षांच्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जहांगिराबादमधील गंगेच्या घाटावर हा प्रकार घडला. महिलेने तिच्या ५ मुलांसह गंगा नदीत उडी मारल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली. पण नंतर तपास केल्यावर महिलेने आपल्या पाच मुलांना गंगा नदीत फेकल्याचं समोर आलं आहे. चौकशीत या महिलेने तशी कबुलीही दिलीय, अशी माहिती पोलिसांनी दिली. गंगा नदीत इतर मुलांचा शोध घेण्यात आहे, असं पोलीस अधीक्षक रामबदन सिंह यांनी सांगितलं.
पोलिसांसह इतर यंत्रणांच्या मदतीने आणखी चार मुलांचा गंगा नदीत शोध घेतला जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times