नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील शाहीन बागेत अतिक्रमण विरोधी कारवाई वरुन जोरदार घोषणाबाजी झाली. सकाळी अतिक्रमण विरोधी कारवाईसाठी पोहोचलेला बुलडोझर कोणतीही कारवाई न करता परतला. शाहीनबागेतील एक अस्थायी बांधकाम पाडण्यासाठी बुलडोझर सुरु करण्यात आला तेव्हा स्थानिकांनी तो पाडण्यास सुरुवात केली. दक्षिण दिल्ली महापालिकेला यामुळं बुलडोझर द्वारे कारवाई करता आली नाही. सकाळी ११ वाजता महापालिकेचे बुलडोझर पोहोचला तेव्हा स्थानिकांनी रस्त्यावर जमा होऊन घोषणाबाजी सुरु केली. केवळ मुस्लीम समुदायाला लक्ष्य केलं जात असल्याचा दावा करत नागरिकांनी कारवाईला विरोध केला. शाहीनबागेतील महिला देखील मोठ्या प्रमाणात जमा झाल्या होत्या, त्यांना हटवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र, महिला आक्रमक असल्यानं त्यांनी हस्तक्षेप केला नाही. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महिलांच्या तुकडीला समोर पाठवून आंदोलकांना अटक करण्यात आली. मात्र, आम आदमी पार्टीचे एक नेते तिथं दाखल झाले आणि शाहीनबागेत बुलडोझरद्वारे कारवाई करुन भीती दाखवण्याचं काम सुरु असल्याचं ते म्हणाले. ओखलाचे आमदार अमानतुल्लाह खान देखील शाहीन बागेत पोहोचले होते. खान यांनी दोन दिवसांपूर्वी सर्व अतिक्रमण हटवण्यात आल्याचा दावा केला. भाजप नेत्यांकडून वातावरण बिघडवण्याचं काम सुरु असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. शाहीनबागेत अतिक्रमण कुठं आहे हे दाखवावे, असं आव्हान अमानतुल्लाह खान यांनी दिलं.दोन तास हा वाद सुरु होता, मात्र, त्यानंतर कोणतीही कारवाई न करता बुलडोझरला माघारी जावं लागलं.

मतदान करायला जाताना सिलिंडरला नमस्कार करा; PM मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल
अचानक कारवाई

दक्षिण दिल्ली महापालिकेच्यावतीनं अतिक्रमण विरोधी कारवाई अचानकपणे करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. आम्हाला नोटीस देण्यात आली नाही, आम्ही बुलडोझर चालवू देणार नाही, असं शाहीनबागेतील स्थानिकांनी म्हटलं आहे. नोटीस न देता करण्यात येत असलेली कारवाई असंविधानिक असल्याचा आरोप देखील आंदोलकांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दिल्लीत ८० टक्के अवैध बाधकामं ती पाडा
स्थानिक नगरसेवक वाजिद खान यांनी ज्या रस्त्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याचा दावा केला जात आहे, तिथं अतिक्रमण नसल्याचा दावा केला. वाजिद खान यांनी ज्यांनी चुकीचं बांधकाम केलंय ते पाडलं जावं, असं देखील म्हटलं आहे. कोणत्याही नागरिकानं रस्त्यावर घर बांधलेलं नाही. अतिक्रमण विरोधी पथक घर पाडणार असेल तर दिल्लीत ८० टक्के बांधकामं अवैध आहेत त्यामुळं ती तोडली जावीत, असंही ते म्हणाले.
Cyclone Asani : ‘असनी’ चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट; हवामान विभागाने म्हटले, पुढील दोन दिवसांत…
दक्षिण दिल्लीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राजपाल सिंह यांनी आम्हाला सुरक्षा मिळाली तर आम्ही कायदेशीर कारवाई करु असं म्हटलं आहे. आमचं पथक तयार आहे, कोणतंही ठिकाण असलं तरी आम्ही अतिक्रमण काढू, शाहीनबागेतील ५०-६० टक्के लोकांनी अतिक्रमण हटवल्याचं राजपाल सिंह म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here