अमरावती : अमरावती जिल्ह्यातील भीषण दुष्काळातून अथक परिश्रम घेऊन जगवलेल्या संत्रा बागांवर बदलत्या वातावरणाने अज्ञात रोगाचे सावट आल्याचे दिसत आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा गळती, संत्रा झाडांची पाने पिवडी पडून संत्रा झाडे वाळत चालली आहे. यावर सर्व उपाययोजना करून काही उपयोग होत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे संत्राबागा वाचविण्याचे आव्हान संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

संशोधकांनी व कृषी विभागाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन अशी मागणी होत आहे. अमरावती जिल्ह्या हा विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर सतत संकटांची मालिकाच सुरू आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अज्ञात रोगाची लागण, मोठ्या प्रमाणात खर्च करूनही संत्राला मिळणार अत्यल्प भाव, संत्रा गळती, अश्या दृष्ट्चक्रात संत्रा उत्पादक शेतकरी भरडला जात आहे.

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, २ जागीच ठार; ५ गंभीर जखमी
यावर्षी उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असल्याने संत्राचे उत्पादन धोक्यात आले आहे. जिल्ह्याचे तापमान ४५ डिग्रीच्यावर गेल्यामुळे संत्री गळून पडत आहे. सोबतच ब्लॅक फंगस नावाचा रोग आल्यानेसुद्धा संत्र्याची गळती मोठ्याप्रमाणात वाढल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे मोर्शी, अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे.

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी विभाग यांच्या उदासीन धोरणामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था व क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संशोधकांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल. विविध रोगांवर, संत्रा फळं गळतीवर नेमके काय उपाय आहेत. त्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून तज्ञांचे मार्गदर्शन केंद्र सुरू करावे अशी मागणी होत आहे.

शेतात काम करताना उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here