कोलंबो : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. श्रीलंकनं अर्थव्यवस्था (Shri Lanka Economic Crisis) डबघाईला आल्यानंतर देशभरात राजपक्षे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत होतं. श्रीलंकेची अर्थव्यवस्था संकटात येण्यास राजपक्षे परिवार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी आणि आंदोलकांनी केला होता. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी देशात आणीबाणी लागू केली होती.

अमित शहांच्या डिनर डिप्लोमसीची चर्चा देशभरात; गांगुली राजकारणात येणार का? पत्नीने दिले उत्तर
राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यासाठी आग्रह केल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. मात्र, महिंदा राजपक्षे यांनी याचं खंडण केलं आहे. श्रीलंकन माध्यमांच्या माहितीनुसार सत्ताधारी एसएलपीपी आि सहयोगी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करुन महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे.

संपूर्ण श्रीलंकेत कर्फ्यू लागू
राष्ट्रपती राजपक्षे यांनी शुक्रवार पासून आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेतील स्थानिक जनतेकडून आणीबाणीला विरोध करण्यात आला. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी हल्ला केल्यानंतर राजधानी कोलंबोमध्ये सैन्य तैनात करण्यात आलं आहे. आंदोलकांच्या हल्ल्यात २३ जण जखमी झाले होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेत देशभर कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

Breaking News : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर राजद्रोहाच्या कलमात बदल?, केंद्र सरकारचे एक पाऊल मागे
एका महिन्यात दुसऱ्यांदा आणीबाणी
श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवंलूबन आहे. करोना विषाणू संसर्गाच्या काळात पर्यटन बंद असल्यानं अर्थव्यवस्था संकटात आली होती. श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं कर्ज देण्यासाठी ७ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गरज आहे. मात्र, सध्या श्रीलंकेकडे १ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं परकीय चलन आहे. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे, पंतप्रधान महिंदा राजपक्षे, संरक्षण मंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद राजपक्षे कुटुंबाकडे असल्यानं आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी कॅबिनेट बैठक घेऊन शुक्रवारपासून आणीबाणी लागू केली होती. श्रीलंकेला १९४८ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. चीननं श्रीलंकेला मदतीचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण केलं नव्हतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here