नवी दिल्लीः दिल्ली-एनसीआरमध्ये संध्याकाळी ५.५० मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राममध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिक घाबरून घराबाहेर पडले. काही गलरीत येऊन उभे राहिले. भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ३.५ इतकी नोंदवली गेली.

दिल्ली-एनसीआरमधील भूकंपाचं केंद्र हे पूर्व दिल्लीत जमिनीखाली ८ किलोमीटर इतक्या अंतरावर होतं. भूकंपाच्या हादऱ्याने नागरिक घाबरून बाहेर आले. पण भूकंपाचा एकच धक्का जणावला. दुसऱ्यांना धक्के जाणवले नाही. आधीच करोनाचं संकट त्यात भूकंपाचा धक्क्याने दिल्लीकर घाबरले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी यांसदर्भातल ट्विट केलं.

भूकंपाच्या हादऱ्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केलं. सर्व सुरक्षित आहेत, अशी अपेक्षा करतो. सुर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो, असं केजरीवाल यांनी म्हटलंय.

भूकंपात कुठलीही हानी झालेली नाही. भूकंपाचा धक्का सौम्य होता. यामुळे घरात जाण्यास काहीच हरकत नाही. भूकंपाचं केंद्र जमिनीखाली १५-२० किलोमीटर अंतरावर असतं तर भूकंपाची तीव्र अधिक राहिली असती. सुदैवाने भूकंपाचं केंद्र हे जमिनीखाली ८ किलोमीटर अंतरावर होतं, असं तज्ज्ञांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here