नवी दिल्ली : आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यासाठी आणि न्याय मिळेल, या अपेक्षेसाठी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. मुंबई पोलिसांनी आपल्याविरोधात चुकीची कारवाई केली तसेच आपल्याला हीन दर्जाची वागणूक दिल्याचं त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सांगितलं. अटकेपासून, लॉकअपपर्यंत आणि जेलपासून सुटकेपर्यंत सगळी माहिती ओम बिर्लांना दिली, असं भेटीनंतर नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

नवनीत राणा आज राजधानी नवी दिल्लीत दाखल झाल्या. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी ओम बिर्ला यांची भेट घेतली. घडलेली सगळी घटना त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या कानावर घातली. त्यानंतर त्यांनी ओम बिर्ला यांच्यासोबतच्या भेटीचा तपशील माध्यमांना दिला. दरम्यान, राणा दाम्पत्याला कोर्टाने जामीन देताना माध्यमांशी न बोलण्याची अट घातली होती. मात्र जामीनानंतरही त्या माध्यमांशी बोलल्या. आज यावरुनच कोर्टाने त्यांना नोटीस पाठवली. पण नोटीस पाठवूनही राणांना माध्यमांशी बोलण्याचा मोह काही आवरत नाहीये. आज पुन्हा एकदा त्यांनी कोर्टाचा आदेश धूडकावून माध्यमांशी संवाद साधणं पसंत केलं.

१४ दिवसच काय, १४ वर्ष मी तुरुंगात राहायला तयार : नवनीत राणा

अटकेपासून, लॉकअपपर्यंत आणि जेलपासून सुटकेपर्यंत पूर्ण माहिती दिली

नवनीत राणा म्हणाल्या, “लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना मी आताच भेटले. माझ्यासोबत जे पण काही घडलं, ते मी डिटेलमध्ये त्यांना सांगितलं. अटकेपासून, लॉकअपपर्यंत आणि जेलपासून सुटकेपर्यंत पूर्ण माहिती दिली आहे. लोकसभा अध्यक्षांनीही मला जे जे घडलं त्याबद्दल पूर्ण माहिती विचारली, मी त्यांना डिटेल्समध्ये सगळी माहिती दिली आहे. २३ तारखेला माझ्या जबाबाची नोंद होणार आहे, लेखी देखील देणार आहे.

ज्यांची नावं द्यायची आहेत, त्यांची नावं दिली

“ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष आहेत, मी खासदार आहे, माझ्यावरील कारवाईची सगळी माहिती मी त्यांना दिली आहे. आम्हाला अटक करण्यात आली, कुणाच्या आदेशावरुन कारवाई झाली. माझी तक्रार ऐकण्यासाठी २३ तारीख निश्चित करण्यात आली आहे. मी बिर्ला यांच्याकडून न्यायाची अपेक्षा केली आहे. महिलांशी अशी वर्तवणूक दुर्दैवी आहे. ओम बिर्ला यांच्याशी भेट झाली, या भेटीत ज्यांची नावं द्यायची आहेत, त्यांची नावं दिली आहेत”, असंही नवनीत राणा यांनी सांगितलं.

Navneet Rana: नवनीत राणांची तुरुंगातून सुटका; प्रकृती बिघडल्याने थेट लीलावती रुग्णालयात

ओम बिर्ला यांच्याकडून न्यायाची अपेक्षा

ज्यांनी कारवाईचे आदेश दिले, मग मुंबईचे सीपी संजय पांडे असू देत किंवा दुसरं कुणीही त्यांच्याबद्दल मी ओम बिर्ला यांना माहिती दिली. त्यांच्याविरोधात कारवाई होईल, अशी मला आशा आहे, असंही नवनीत राणा यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here