सातारा : साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ज्यांनी मला जातीवादी म्हणून हिनवले त्या विनोदी वक्तव्याचा मी आस्वाद घेतला. अशा प्रकारची विधानं करण्यामुळे लोक हसतात. अशी विधान लोक गांभीर्याने घेत नाहीत. लोक ऐकतात आणि सोडून देतात असे सांगत पवारांनी टिकाकारांना टोला लागवला आहे.
आज देशात महागाई वाढली आहे, बेकारी वाढली आहे. या विषयाकडे न पाहता भोंग्याचे विषय घेतले जातात. ज्यांना आधार नाही ते अशी लोकांची मन भरकटवण्याचा प्रयत्न करतात, अशी नाव न घेता राज ठाकरेंवर पवारांनी टीका केली आहे.