जळगाव : शहरात लहान मुलांना खाऊचे आमिष दाखवून बालकाचे अपहरण करून त्यांना निर्जनस्थळी घेवून जायचा. त्यानंतर त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून झाल्यानंतर बालकाचा खून करणाऱ्या नराधमाला जळगाव जिल्हा न्यायालयाने सोमवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यश उर्फ गोलु चंद्रकांत पाटील (वय २१) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

डांभुर्णी गावातील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलाशी त्याची ओळख झाली. त्यानंतर यश त्याला गावातील शेतात शौचालयाला जायचे म्हणून घेऊन गेला आणि त्याठिकाणी त्या अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक संभोग केला. एवढेच नव्हे तर त्या मुलाला जीवे ठार मारले. अल्पवयीन मुलगा घरी आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी तालुका पोलीस स्टेशनला मुलाच्या अपहरणाची फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून तपास सुरु असतांना मुलाचा मृतदेह १६ मार्च २०२० रोजी मिळून आला. त्यानंतर अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याच दिवशी आरोपी यश उर्फ गोलु चंद्रकांत पाटील याला अटक करण्यात आली होती. तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी गुन्ह्याचा तपास करून १० जून २०२० रोजी सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

वॉर्नर हे वागणं बरं नव्हं… भर मैदानात दिली अम्पायरला खुन्नस, ८ सेकंदांचा व्हिडीओ झाला व्हायरल…
एकूण १२ साक्षीदार तपासले…

सदर खटल्यात सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले. आरोपी विरुद्ध गुन्हा सिध्द होण्यासाठी जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्याकडे एकूण १२ साक्षीदार तपासले. यात प्रामुख्याने गावातील त्या दिवशी बर्फाचा गोळा विकणारा अनिल भोई, डॉ. निलेश देवराज, लक्ष्मण सातपुते, ना.तहसीलदार व इतर पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. खटल्याची सुनावणीत जिल्हा सरकारी वकील यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. युक्तिवादातून मांडलेल्या सर्व पुराव्यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी आरोपीला दोषी ठरवून गोलू चंद्रकांत पाटील याला अल्पवयीन पीडित मुलगा यांच्यावरील अनैसर्गिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १ लाख १५ हजाराचा दंड सुनावला.

धोनी खरच बॅट खात होता का? ८ चेंडूत अशी धुलाई केली की रेकॉर्डच झाला
डांभुर्णीनंतर भोकरच्या हत्येचाही झाला उलगडा…

आरोपी यशला अटक केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जळगावात आणले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने जळगाव तालुक्यातील भोकर येथील एका अल्पवयीन बालकाची क्रूरपणे हत्या केल्याची कबुली दिली. भोकर येथील बालक हा १२ मार्च रोजी अचानक बेपत्ता झाला होता. तर त्यानंतर १६ मार्च रोजी भोकर शिवारातील एका शेतात अल्पवयीन मुलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. त्याची अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर गळा दाबून हत्या झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले होते.

Smartphone Offers: Xiaomi चा ३२ हजारांचा ५जी फोन फक्त ५ हजारात खरेदीची संधी, फीचर्स एकापेक्षा एका शानदार
बालकांवर करायचा अनैसर्गिक अत्याचार करुन खून…

आरोपी यश हा वासनांध झाला होता. तो लहान बालकांवर अनैसर्गिक अत्याचार करायचा. बालकांना खाऊचे आमिष दाखवून त्यांना निर्जनस्थळी न्यायचे, त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचे आणि त्यानंतर हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून त्यांची निर्घृणपणे हत्या करायची, अशी आरोपी यशची गुन्हा करण्याची पद्धत पोलीस तपासातून समोर आली होती.

सोनं-चांदी झालं स्वस्त ; नफावसुलीने सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here